कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार :कार्यकुशलतेची दखल; जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित .
कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार कार्यकुशलतेची दखल; जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित कडेगाव : सचिन मोहिते . कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांना जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर. कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये कार्यालयीन कामकाजात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यातर्फे आयोजित कार्य मूल्यमापनात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारीअशोक काकडे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते तहसिलदार अजित शेलार यांना अधिकृत प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्यकुशलतेची, वेळेवर निर्णयक्षमतेची आणि जनहितदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. "तहसीलदार शेलार यांनी आपल्या पदाचा कार्यभार अत्यंत ...